
प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 49 वर झाला आहे. मृतांपैकी 24 जणांची अद्याप ओळख पटली नाही. अज्ञातांची ओळख पटवण्यासाठी प्रशासनाकडून त्यांचे फोटो जारी करण्यात आले आहेत. मौनी अमावस्येच्या दिवशी महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. यात 30 जणांचा मृत्यू झाला होता, तर 60 जण जखमी झाले होते.
प्रयागराजमध्ये विविध ठिकाणी शाही स्नानाची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र भाविकांचा ओढा संगम घाटाकडे अधिक होता. यामुळे संगम घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली. यात 49 जणांना प्राण गमवावा लागला. मृत 24 जणांची ओळख पटवण्यासाठी प्रयागराज पोस्टमार्टम हाऊसबाहेर त्यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत.
 
             
		





































 
     
    





















