महापारेषणमध्ये 8500 पदांची नोकरभरती

महापारेषण या वीज वहन कंपनीमध्ये तांत्रिक श्रेणीतील तब्बल 8500 पदे रिक्त असून ती तात्काळ भरण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी, आयटीआयचे शिक्षण घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे 2005 साली विभाजन होऊन महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीन कंपन्या तयार झाल्या तेव्हाच महापारेषणमधील अनेक तांत्रिक पदे रिक्त होती. त्यानंतरही अपेक्षित पदे न भरली गेल्याने रिक्त पदांची संख्या वाढत गेली आहे. सध्या तांत्रिक संवर्गातील 6750, तर अभियंता संवर्गातील 1750 पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱयांवर कामाचा ताण येत आहे. त्याची दखल घेत उर्जामंत्र्यांनी रिक्त पदे भरण्याबाबतच प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महापारेषणचे एमडी दिनेश वाघमारे यांना दिल्या होत्या. त्यानुसार वाघमारे यांनी आज सदर प्रस्ताव सादर केला असता उर्जामंत्र्यांनी तत्काळ नोकरभरती करण्याचे निर्देश दिले. यावेळी यंत्रचालक व तंत्रज्ञ संवर्गाचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे कनिष्ठ स्तरावर काम करणाऱया तांत्रिक कर्मचाऱयांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या