
महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट आता आटोक्यात आली असून आज समोर आलेली आकडेवारी ही दिलासादायक आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 1553 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 1682 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच राज्यात कोरोनामुळे 26 जणांचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत 64,16,998 कोरोनाबाधित हे बरे झाले आहेत. राज्याचा रुग्ण रिकव्हरीचा रेट हा 97.38 टक्क्यांवर आला आहे. आतापर्यंत राज्यातील 65,89,982 जणांना कोरोना झाला असून 1,39,760 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदरही कमी होऊन 2.12 टक्क्यांवर आला आहे.































































