
कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस होणारी घट ही महाराष्ट्रासाठी दिलासा देणारी बाब ठरत असून आतापर्यंत 16 लाख 5 हजार 64 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 7 हजार 809 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.44 टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात 4 हजार 496 नव्या रुग्णांचे निदान झाले असून सध्या 84 हजार 627 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.मागील 24 तासांत 122 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.63 टक्के इतका झाला आहे.
मुंबईत दिवसभरात 858 जणांना कोरोना
मुंबईत आज दिवसभरात 858 रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 2,175 जण कोरोनामुक्त झाले. मात्र, विविध शारीरिक आजार असलेल्या 19 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत 19 जणांचा मृत्यू झाल्याने एपूण मृतांची संख्या आता 10 हजार 522 झाली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एपूण संख्या 2 लाख 41 हजार 975वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 240 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 11 हजार 531 इतकी आहे.



























































