
महाराष्ट्रातील वीज उद्योग क्षेत्रात हातपाय पसरत वीज वितरणासाठीचा 1,600 कोटी रुपयांचा प्रकल्प अदानी एनर्जी सोल्युशन्सने खिशात टाकला आहे. अदानी समूहाकडून शुक्रवारी याची घोषणा करण्यात आली. या प्रकल्पामुळे अदानीचा वीज वितरणाचा व्यवसाय 61,600 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
या आधी महाराष्ट्रातील 6,600 मेगावॅट वीज निर्मितीचे पंत्राट अदानीने मिळविले होते. त्या पाठोपाठ आता वीज वितरणाचा 1,600 कोटींचा प्रकल्प अदानीच्या घशात गेला आहे. या प्रकल्पाअंतर्गत तीन हजार मेगा व्होल्ट-अँपिअर (एमव्हीए) क्षमतेची सबस्टेशन्स (एमव्हीए), वितरणाच्या पायाभूत सुविधा निर्माण करावी लागणार आहे. यामुळे वितरणाचे नेटवर्क वाढेल. हा प्रकल्प 2028मध्ये कार्यान्वित होईल.
n मुंबईतील विमानतळाचे संचालन अदानीकडे आहे. याशिवाय महायुतीचे सरकार आल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प अदानीच्या घशात गेले आहेत. मुंबईतील धारावी, मोतीलाल नगर, वांद्रे रेक्लमेशन, बीकेसी येथील अनेक मोठे प्रकल्प अदानीने मिळविले. धारावीच्या नावाखाली तर मुंबईतील अकराशे एकर जमीन अदानी समूहाने लाटली आहे.