मच्छीमार-कोळी समाजाचा शिवसेनेला पाठिंबा

532

अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवली आणि पालघर येथील प्रचारसभेत पर्ससीन नेट आणि एलईडी लाइटच्या माध्यमातून होणाऱ्या मासेमारीबंदीला 5 फेब्रुवारी 2011 च्या कायद्याची अंमलबजावणी करून वाढवण बंदरला विरोध करण्याची भूमिका मांडली. या भूमिकेचे मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी स्वागत केले आहे. तसेच मुंबईसह कोकणातील शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करण्याचा निर्णय तांडेल यांच्या निवासस्थानी झालेल्या पदाधिकाऱयांच्या बैठकीत घेण्यात आला.

विधानसभा २०१९ – शिवसेनेचा माहीमचा गड मजबूत

मुंबई, कोकणातील कोळी समाजाच्या 400 गावांच्या घरांच्या आणि मासळी सुकविण्याच्या जमिनी मालकीहक्काने सातबारा उताऱ्यावर करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणा, कोळीवाडय़ातील घरांना 33 फूट उंचीच्या बांधकामाला सीआरझेड आणि नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोळीवाडे गावठाणाला एसआरए लागू करू नये, क्रॉफर्ड मार्केटमधील मासळी बाजाराला संरक्षण तसेच विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आणि वरळीचे महायुतीचे उमेदवार आदित्य ठाकरे यांना देण्यात आले. आदित्य यांनी कोळी समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे तांडेल यांनी सांगितले.

आदित्य ठाकरेंची वरळीत बाईक रॅली! मुंबईत शेवटच्या दिवशी प्रचाराची धूम

मल्याळी समाजाचाही पाठिंबा

मल्याळी समाजानेही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, ठाणे, कल्याण, मीरा, भाईंदर, वसई, विरार यांसह राज्यात विविध ठिकाणी मल्याळी समाज स्थायिक झाला आहे. मल्याळी समाजाचे विविध प्रश्न शिवसेनेने मार्गी लावले आहेत. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मल्याळी समाजाचे नेते आणि भारतीय कामगार सेनेचे चिटणीस दिलीप पणीकर यांनी दिली

आपली प्रतिक्रिया द्या