प्रचाराचा धुरळा उडणार, राज्यात मोदींच्या 9, शहांच्या 20 सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर मंगळवारी भारतीय जनता पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली. भाजपने 125 उमेदवारांची घोषणा केली आहे. सर्वच पक्ष आता आपले उमेदवार जाहीर करत असल्याने प्रचाराला स्फुरण चढणार आहे. येत्या काही दिवसात राज्यामध्ये प्रचाराचा धुरळा उडणार आहे. भारतीय जनता पक्षाने उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना मैदानात उतरवले आहे.

परळी – दसरा मेळाव्याला अमित शहा उपस्थित राहणार

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) 9, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या (Amit Shah) 20 आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या 65 सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान अमित शहा हे भगवानगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. पंकजा मुंडे यांनी दिलेलेला आमंत्रण शहा यांनी स्वीकारल्याचे वृत्त आहे.

विद्यमान पाच आमदारांसह राधाकृष्ण विखे यांना शिर्डीतून तर वैभव पिचड यांना अकोल्यातून उमेदवारी

अमित शहा 8 ऑक्टोबरला भगवान भक्ती गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडेंचा चौथा दसरा मेळावा आहे. यासाठी पंकजा मुंडेंनी खास अमित शहांना आमंत्रित केले आहे. पंकजा मुंडे यानिमित्ताने आपले शक्तीप्रदर्शन करणार आहेत.