अप्पासाहेब धर्माधिकारी ‘महाराष्ट्र भूषण’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 या वर्षाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. 25 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिक्कामोर्तब केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. रेवदंडा येथे जाऊन मुख्यमंत्री  व उपमुख्यमंत्री यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली.

पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म 14 मे 1946 रोजी झाला. मागील तीस वर्षे ते निरुपण करत असून अंधश्रद्धा, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठका सुरू केल्या आणि आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले. रायगड जिह्यातील रेवदंडय़ात त्यांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन, भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे.