
राज्यात भाजपची सत्ता असताना शिवसेनेसह विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मध्यंतरी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनीही असाच आरोप करत चौकशीची मागणीही केली होती. याची गंभीर दखल घेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपच्या काळातील फोन टॅपिंगची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत असताना राज्यात काळजीवाहू सरकार म्हणून काम करणाऱया भाजप नेत्यांनी सत्तेचा गैरवापर करत विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अन्य वरिष्ठ नेत्यांच्या फोन टॅपिंगची चौकशी करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत. पोलिसांच्या सायबर सेल विभागाकडून ही चौकशी केली जाणार आहे.
इस्रायलवरून सॉफ्टवेअर कुणी आणले?
विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारचे काही अधिकारी इस्रायलला गेले होते. त्यांनी तिथून आणलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करून विरोधकांचे फोन टॅप केले, अशा तक्रारी आल्यात. या प्रकरणाला गांभीर्याने घेत इतर पक्षांच्या नेत्यांकर पाळत ठेवण्यासाठी आकश्यक तंत्रज्ञान घेण्यासाठी इस्रायलला कोण गेले होते, याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
































































