
अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधी पक्ष सज्ज झाला आहे. सरकारविरोधातील विविध मुद्दे विरोधी पक्षातील महाविकास आघाडीच्या हाती आहेत. अजित पवार यांचा विमान अपघात, पार्थ पवार यांना मुंढवा जमीन प्रकरणात दिलेली क्लीन चिट आणि मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणासह इतर अनेक मुद्यांवरून अधिवेशनात सरकारला जाब विचारणार, असा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. त्यामुळे सरकार अडचणीत येणार आहे.
मुद्दे गाजणार…
- वाढती बेरोजगारी आणि तरुणाईला ड्रग्जचा विळखा
- मंत्रालयासह राज्यात वाढलेली लाचखोरी
- मुलुंडमधील मेट्रोचा अपघात 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा
- दावोसमधील गुंतवणूक करार
- शेतकरीविरोधी शक्तीपीठ महामार्ग
- शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी
- नरहरी झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी
मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने केली आहे. या लाचखोरी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून झिरवाळ यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी विरोधकांची मागणी आहे.


































































