राज्यात गरीब सवर्णांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण लागू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना महाराष्ट्रात शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली आहे. 10 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षी 2019-20 या वर्षापासून केली जाणार आहे.

गरीब सवर्णांना सरकारी नोकरी आणि देशातील सर्व सरकारी, खासगी, अनुदानित, विनाअनुदानीत शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी 10 टक्के आरक्षण लागू करणारी अधिसूचना केंद्र सरकारने काढली आहे. या आरक्षणाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. आज आरक्षणासाठी देण्यात आलेल्या मंजुरीनंतर सर्व शैक्षणिक संस्थांना सुचना देण्यात येतील.

दरम्यान, या आधी गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना शैक्षणिक विभाग आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे.