राज्यात 19 हजार 218 नवे रुग्ण, 13 हजार 289 रुग्ण बरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात 19 हजार 218 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 13 हजार 289 रुग्ण आज बरे झाले आहेत.एकूण 6 लाख 25 हजार 773 रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.51 टक्के आहे. शुक्रवारी 19 हजार 218 नकीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या 2 लाख 10 हजार 978 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 378 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.1 टक्के एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 44 लाख 44 हजार 249 नमुन्यांपैकी 8 लाख 63 हजार 062 नमुने पॉझिटिव्ह (19.32 टक्के) आले आहेत. राज्यात 14 लाख 51 हजार 343 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 36 हजार 783 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात 1,929 कोरोना रुग्ण; 1,110 कोरोनामुक्त, 35 जणांचा मृत्यू

मुंबईत शुक्रवारी दिवसभरात 1,929 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत 1,110 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या आता 1 लाख 21,671 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 35 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 35 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 7 हजार 796 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 77 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 22 हजार 220 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 8 लाख 02 हजार 647 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 52,024 वर पोहोचली आहे.