राज्यात नऊ कोटींची दारू जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
liquor Liqueur

राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर आतापर्यंत 11 लाख 88 हजार लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. या दारूची किंमत सुमारे 9 कोटी 71 लाख रुपये आहे, तर अवैधरीत्या दारू पुरवणाऱ्या सहा परवानाधारकांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी आज दिली.

राज्यात आचारसंहिता लागू झाल्यावर मद्याच्या विक्रीवर लक्ष केंद्रित केले आहे. निवडणूक आचारसंहिता नियमांचा भंग करणा-या तसेच मुंबई विदेशी मद्य नियमांचा भंग करणाऱ्या आणि बेकायदा मद्य विक्री करणाऱ्या दारूच्या दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. मुंबईच्या उपनगरातील वैशाली वाईन्स, व्हरायटी वाईन्स या दुकानांचे परवाना रद्द करण्यात आले आहेत. मुंबई विदेशी मद्य नियमावलीचा भंग केल्यामुळे शशी लंच होम, हॉटेल स्वस्तिक या हॉटेलचा परवाना निवडणूक संपेपर्यंत रद्द करण्यात आला तर 24 लॉज बार, प्लॅटिनम बार, शिवलीला बार, जरना हॉटेलचा परवाना 8 ते 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. मुंबई उपनगर जिह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

बेकायदा दारू विक्रीच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 18008333333 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी केले.