
वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीत चांगली मते मिळाली. आम्ही जिंकू शकलो नाही, पण दहा ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. अनेक ठिकाणी जोरदार टक्कर दिल्याचे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. वंचित आघाडीला मतदान करून दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी ट्विट करत मतदारांचे खास आभार व्यक्त केले आहे.
वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीत 24 लाखांपेक्षा जास्त मते वंचितच्या उमेदवारांना मिळाली आहेत. दहा ठिकाणी दुसऱया तर काही ठिकाणी तिसऱया क्रमांकाची मते मिळाली आहेत. आगामी काळात वंचित आघाडी त्याच ताकदीने राज्याच्या राजकारणात उभी राहील आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर, सामाजिक, राजकीय न्याय्य हक्कांसाठी लढत राहील असा निर्धार आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
























































