
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे 15 ते 30 एप्रिलदरम्यान राज्यात संचारबंदी आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कशालाही परवानगी देण्यात आलेली नाही. कडक निर्बंधांच्या काळात काय सुरू-काय बंद राहील, कोणत्या सुविधांना सूट मिळणार याबाबत असलेल्या प्रश्नांची उत्तरे देत राज्य सरकारने जनतेच्या मनातील संभ्रम दूर केला आहे.
राज्यात लागू करण्यात आलेल्या कोरोना निर्बंधांच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ आवश्यक गटातील दुकान्sैच उघडी राहू शकतील. वाईन शॉप्स आणि सिगारेट दुकाने तसेच स्टेशनरी, पुस्तकांची दुकाने, वस्त्राsद्योग आणि कपडे उद्योग सुरू ठेवता येणार नाहीत. केवळ निर्बंध टाकायचे म्हणून टाकलेले नाहीत तर नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे दिलेल्या सवलतीचा विचारपूर्वक आणि अत्यावश्यक असेल तरच उपयोग करावा अन्यथा या सवलतीवरदेखील निर्बंध आणावे लागतील, असे सरकारी आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
- मूव्हर्स अॅण्ड पॅकर्सच्या मदतीने घरसामान हलवू शकतात का?
– अतिशय अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक प्रशासन याला परवानगी देईल. मात्र सर्वसामान्यरीत्या याचे उत्तर नाही असेच आहे. - कुरीयर सेवा सुरू राहील का?
– फक्त आवश्यक कारणांसाठी कुरीयर सेवा सुरू राहू शकेल. - प्लंबर. सुतार, वातानुकूलन, पेस्ट कंट्रोल व इतर घरगुती सामानाची दुरुती करणारे येऊ शकतात का?
– अगदी टाळण्यासारखे नसेल तर पाणी आणि वीज याबाबतीत सेवा देणाऱया व्यक्ती ये-जा करू शकतात. त्याचप्रमाणे पेस्ट कंट्रोल, घर स्वच्छता, उपकरण दुरुस्ती खूप आवश्यक असले पाहिजे. - लोकं सकाळी फिरायला जाणे, धावणे, सायकलिंग करू शकतात का?
– नाही. - डेंटिस्टचे दवाखाने सुरू राहतील का?
– होय . - घरकाम करणारे, वाहनचालक, स्वयंपाकी कामावर येऊ शकतात का? रेल्वे, बसेसने प्रवास करू शकतात का?
– प्रत्येक शहरांत संसर्गाची वेगेवेगळी परिस्थिती आहे, त्यामुळे याबाबतीत स्थानिक प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा.
प्रवास व्यवस्था
- सर्वसामान्य नागरिक वैध कारणांसाठी लोकल रेल्वेचा उपयोग करू शकतील.
- खासगी कार्यालयातील कर्मचाऱयांना कार्यालये किंवा आस्थापनाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करता येईल.
- बाहेरगावी जाणाऱया रेल्वेसेवा ही आवश्यक सेवा असल्याने त्या सुरूच राहतील आणि त्यातून कुणीही प्रवास करू शकेल.
- कोणत्याही योग्य व आवश्यक कारणास्तव प्रवास करू नये. तुम्ही सार्वजनिक वाहनाचा उपयोग करून एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकता.
ट्रव्हल कंपन्यांची सेवा ऑनलाइन
ट्रव्हल एजन्सीज दुकान सुरू ठेवून काम करू शकणार नाहीत, मात्र ऑनलाइन काम करू शकतात. आपण एक खिडकी योजनेतील सर्व सुविधा जसे की व्हिसा, पासपोर्ट सेवा, सर्व शासकीय सेतू केंद्रे हे शासनाचा एक भाग म्हणून मान्यता दिली आहे.
बांधकाम साहित्याची दुकाने उघडता येणार नाहीत
आदेशात नमूद केल्याप्रमाणे संबंधित बांधकाम स्थळ सुरू ठेवण्यास परवानगी असेल तर बांधकाम साहित्य ने-आण करता येईल. साहित्यांची ऑर्डर ऑनलाइन किंवा दूरध्वनीवरून देता येईल. मात्र सिमेंट, रेडी मिक्स, स्टील यासारखे बांधकाम साहित्याचे दुकान उघडे ठेवता येणार नाही.
उपाहारगृह, खाद्यपदार्थ सेवा
- उपाहारगृहामार्फत किंवा ई-कॉमर्समार्फत रात्री 8 नंतर घरपोच वितरित करता येईल का?
– आवश्यक सेवा आणि सुविधांवर तसेच घरगुती पुरवठा करण्यावर बंदी नाही. या सेवा पुरविणाऱया आस्थापनांच्या कामांना स्थानिक प्रशासनाने रात्री 8 नंतर काम करण्यास परवानगी दिली असेल तर घरी पुरवठा (होम डिलिव्हरी) रात्री 8 नंतर करता येईल. स्थानिक प्रशासन वेळेमध्ये आवश्यकता भासल्यास लवचिकता ठेवू शकते. - रस्त्यावरील खाद्यविव्रेते सुरू ठेवू शकतील?
– सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत पार्सल आणि घरगुती वितरणास मान्यता देण्यात आली आहे. (या प्रकारात होम डिलिव्हरी फारशी होत नाही).
वस्तू उत्पादनास परवानगी
आवश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱया कारखान्यांना परवानगी आहे. त्यामुळे तेथील कामगार व कर्मचारी ये-जा करू शकतात. इतर कारखाने व उद्योगांच्या बाबतीत ज्या कामाच्या ठिकाणी किंवा स्वतंत्ररीत्या कामगारांची राहण्याची व्यवस्था केलेली असेल आणि तिथून त्यांच्या प्रवासाची स्वतंत्र व्यवस्था असेल ते उद्योग सुरू राहू शकतात.
































































