तुकाराम मुंढे नागपूरहून मुंबईत, 16 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य सरकारने बुधवारी सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा समावेश आहे. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांची एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारने सोळा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तुकाराम मुंढे यांच्या जागी बी.राधाकृष्णन यांची नागपूर महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.नाशिक महापालिका आयुक्तपदी कैलाश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एस.एम.देशपांडे यांना सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव म्हणून, लोकेश चंद्रा यांना जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे. अंशू सिन्हा यांना कौशल्य विकास विभागाच्या सचिवपदी नियुक्त केले आहे. ए.बी. मिसाळ यांना कोकण विभागीय आयुक्तपद देण्यात आले आहे.रामास्वामी.एन यांना राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. आर. विमला यांना जलजीवन मिशनच्या संचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. डॉ.एन.बी.गिते यांना महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.अविनाश ढाकणे हे नवे परिवहन आयुक्त असतील.सी.के.डांगे यांना भूजल सर्वेक्षण पुणेच्या संचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे.दीपा मुधोळ मुंडे यांची जलस्वराज प्रकल्प नवी मुंबईच्या प्रकल्प संचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. एस. एस. पाटील यांची सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून तर रोहन घुगे यांची चंद्रपूरचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे

आपली प्रतिक्रिया द्या