सांगलीचा सौरभ अन् धाराशीवची गौरी महाराष्ट्राचे कर्णधार

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या कुमार-मुली गटाच्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो -खो स्पर्धा शेवगाव (जि. नगर) येथे झालेल्या पार पडल्या. या स्पर्धेतून 22 ते 26 सप्टेंबरदरम्यान भुवनेश्वर, ओडिशा येथे होणाऱया 40 व्या कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणारा संघ निवडण्यात आला. महाराष्ट्र खो-खो संघाच्या कर्णधारपदी सांगलीचा सौरभ आहिर (कुमार) व धाराशीवच्या गौरी शिंदे (मुली) यांची निवड झाली आहे व त्याची घोषणा संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी केली.

सध्या सुरू असलेली कोविड परिस्थिती पाहता महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने प्रथमच डॉ. किरण वाघ (नगर) यांची फिजिओथेरेपिस्ट म्हणून निवड केली असून ते या संघाबरोबर जाणार असल्याची घोषणा संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी केली. त्याचबरोबर संघाबरोबर आणखी एक विशेष प्रशिक्षक पाठवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राचे संघ खालीलप्रमाणे

कुमार गट – सौरभ आहिर (कर्णधार), प्रथमेश पाटील (सांगली), गौरव सोमवंशी, आदित्य कुदळे, सारंग लभडे (नगर), भरतसिंग वसावे, रवी वसावे, किरण वसावे (धाराशीव), वैभव मोरे, सूरज जोहरे (ठाणे), अथर्व डहाने (पुणे), धीरज भावे (मुंबई उपनगर). राखीव – विवेक ब्राहाने (पुणे), अजय कश्यप (सोलापूर), यश भोईर (ठाणे). प्रशिक्षक – सोमनाथ बनसोडे (सोलापूर), व्यवस्थापक – अजितकुमार संगवे (सोलापूर).

मुली गट – गौरी शिंदे (कर्णधार), जानव्ही पेठे, संपदा मोरे, अश्विनी शिंदे (धाराशीव), वृशाली भोये, कौशल्या पवार, सरिता दिवा (नाशिक), कल्याणी कंक (ठाणे), दीपाली राठोड (पुणे), अंकिता लोहार (सांगली), मयूरी पवार (संभाजीनगर), प्रीती काळे (सोलापूर), राखीव – नम्रता गाडे (धाराशीव), सोनाली पवार (नाशिक), साक्षी पाटील (सांगली), प्रशिक्षक – सचिन चव्हाण (सांगली), राजेंद्र साप्ते (पुणे), व्यवस्थापिका – संध्या लव्हाट (नगर).

आपली प्रतिक्रिया द्या