पोलिसांच्या रजा वाढवल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमितिक रजा 12पासून 20 इतक्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱयांना एक वर्षात 12ऐवजी 8 रजा मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता व त्याअनुषंगाने विशेष बाब म्हणून पोलीस अधिकारी – कर्मचाऱयांना 12 दिवस नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्या. मात्र पोलिसांवरील कामाचा वाढता ताण, विविध सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने बंदोबस्त, व्हीआयपी डय़ुटय़ा यामुळे या नैमित्तिक रजा आणखी वाढवून 20 दिवस करण्याची विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली.