पक्ष संघटना ते सत्तेतील पदं; तटकरे साहेब, अजून काय द्यायला पाहिजे होतं? रोहित पवारांनी यादीच केली शेअर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारची कास धरली. त्यांच्यासोबत शरद पवार यांचे विश्वासू सुनील तटकरे देखील यांनीही बंडखोरी केली. त्यांच्यावर अजित पवार गटाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली, शिवाय त्यांच्या मुलीला मंत्रिपदही दिले. सुनील तटकरे यांच्या बंडखोरीमुळे पवारांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादीने तटकरे यांच्यावर कारवाईही केली असून त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय दिल्लीतील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

बंडखोरीमुळे पवार कुटुंबात फूट पडली असली तरी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार शरद पवारांसोबत शड्डू ठोकून आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ते बंडखोरांवर निशाणा साधत आहेत. यात शरद पवार यांच्या विश्वासू नेत्यांचा समावेश आहे. गुरुवारी त्यांनी दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला होता. तर आज त्यांनी सुनील तटकरे यांच्या लक्ष्य केले आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील तटकरे यांना पक्ष संघटनेत आणि सत्तेत असताना दिसेल्या पदांची यादीच दिली आहे. अजून काय पाहिज? असा सवाल करत त्यांनी तटकरे यांच्या राजकीय कारकिर्दीची चिरफाड केली आहे.

तुम्हाला स्वत:च्या मुलाप्रमाणे जपलेलं, का पत्करली गुलामी? पवारांचा वळसे-पाटलांना परखड सवाल

पक्ष संघटनेत आणि सत्तेतील असं एकही पद नाही जे तुम्हाला मिळालं नाही. तरीही अजून काय द्यायला पाहिजे होतं? छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या रायगड जिल्ह्याचं आपण प्रतिनिधीत्त्व करत आहात.. महाराजांच्या एकाही मावळ्याने कधी फितुरी केली नाही… पण आपण? असा बोचरा सवाल रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांना केला.

आमचा ‘सह्याद्री’ प्रत्येक संकटावर मात करेल! रोहित पवार यांनी ट्विट करत व्यक्त केला विश्वास

सुनील तटकरे साहेब रायगड जिल्हा नेहमीच आपल्या अधिपत्याखाली राहिल याची काळची पवार साहेबांनी घेतली. आमदारकी, खासदारकी, मंत्री अशी सर्वच पदं आपल्या एकट्याच्या घरात दिली. अध्यक्षपदाची जबाबदारीही आपल्यावर सोपवली होती. पण ज्यांनी हे पद सांभाळलं त्यानेच इतरांच्या दावणीला हा पक्ष बांधावा का? असा प्रश्नही आपल्याला कसा पडला नाही? आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.