महाराष्ट्र राज्य महिला निवड फिडे रेटेड बुद्धिबळ; तिसऱया फेरीअखेर आठ खेळाडूंना संयुक्त आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाग्यश्री पाटील, दिव्या पाटील, आदिती कयाळ, ईश्वरी जगदाळे, निहिरा काैल, सानी देशपांडे, राजेश्वरी देशमुख, प्रतिती खंडेलवाल या खेळाडूंनी एच 2 इ  पॉवर सिस्टम महाराष्ट्र राज्य महिला निवड फिडे रेटेड बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱया फेरीअखेर प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्तरीत्या आघाडी प्राप्त केली आहे.

कर्वे रोड येथील अश्वमेध हॉल येथे ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेत जळगावच्या भाग्यश्री पाटीलने पुण्याच्या श्रावणी उंडाळेचा, तर कोल्हापूरच्या दिव्या पाटीलने मृण्मयी बागवेचा पराभव करून 3 गुण मिळवले. पुण्याच्या आदिती कयाळने आपली शहर सहकारी श्रावी बाकलीवालचा पराभव करून 3 गुण मिळवले. पुण्याच्या निहिरा काwलने साताऱयाच्या तन्मय घाटेचा पराभव केला. सांगलीच्या ईश्वरी जगदाळेने पुण्याच्या सई पाटीलवर विजय मिळवला.

स्पर्धेचे उद्घाटन एच 2 इ पॉवर सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडचे आर्य मयूर, माजी राष्ट्रीय बुद्धिबळपटू धवल आढाव, पीडीसीसीचे उपाध्यक्ष अश्विन त्रिमल, एमसीएचे मानद सचिव निरंजन गोडबोले, पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश पुंटे आणि खजिनदार चंद्रकांत मोकाशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चीफ आरबीटर आयए दीप्ती शिदोरे, आयए राजेंद्र शिदोरे आणि एफए श्रद्धा विंचवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.