12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समित्यांचा आज निकाल; गुलाल कोण उधळणार? साडेसात हजार उमेदवारांचे भवितव्य ठरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. उद्या सोमवारी या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार असून सुमारे साडेसात हजार उमेदवारांचे भवितव्य त्या निकालातून स्पष्ट होणार आहे. उद्या कोण गुलाल उधळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिह्यांमधील12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी एपूण 7 हजार 438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी कोणाच्या बाजूने जनतेचा काwल मिळणार हे उद्या निकालानंतर समोर येईल. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून रात्रीपर्यंत सर्व निकाल हाती येतील, असा अंदाज आहे.

मतमोजणी पेंद्राबाहेर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतमोजणीवेळी गडबड होऊ नये म्हणून राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्तेही सतर्प आहेत.

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीत एपूण 68.28 टक्के मतदान झाल्याची माहिती आज राज्य निवडणूक आयोगाने दिली. सर्वाधिक 74.89 टक्के मतदान परभणीत झाले तर रत्नागिरीत मतदानाला सर्वात अल्प प्रतिसाद लाभला. तिथे एपूण मतदारांपैकी फक्त 55.79 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.