936000! महाराष्ट्राचा लसीकरणात विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने आज स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आणखीन एक विक्रम नोंदवला. आज दिवसभरात सायंकाळी 7 वाजेपर्यंत  9 लाख 36 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. एका दिवसात एवढय़ा मोठय़ा संख्येने लसीकरणाची आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी आहे.  या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे शस्त्र असून लसींचा पुरवठा सुरळीत राहिल्यास राज्यात अशाच मोठय़ा संख्येने नागरिकांचे लसीकरण होऊ शकते. दिवसाला किमान 10 लाख लसीकरणाची राज्याची क्षमता असून दिवसभरात झालेल्या विक्रमी लसीकरणाने हे सिद्ध झाले आहे. यापुढेही अशीच विक्रमी संख्येने लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील असेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबईची विक्रमी कामगिरी 2 लाख 19 हजार 727 जणांचे लसीकरण

मुंबईनेही लसीकरणात आज एकाच दिवशी 2 लाख 19 हजार 727 जणांचे लसीकरण करत सर्तवा मोठी कामगिरी करत आपलेच सर्क किक्रम मोडले. मुंबईत आज नोकरी आणि शिक्षणासाठी परदेशी जाणाऱया 727 जणांचे तर अंथरुणाला खिळलेल्या 270 जणांचे लसीकरण झाले. आतापर्यंत 59 लाख 24 हजार 198 जणांनी पहिला डोस तर 19 लाख 91 हजार 554 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.