
महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी नुकताच 50 हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर आता नोंदणीकृत एजंटसच्या संख्येनेही महाराष्ट्रात 50 हजारांचा टप्पा गाठला आहे. सध्या महारेराकडे 50,673 एजंट असून यापैकी विविध कारणामुळे 18,693 एजंटची नोंदणी रद्द केली आहे.
घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील ‘एजंट’ हा अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. बहुतेक वेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटच्या संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडून मिळते. या माहितीच्या आधारे ग्राहक घर खरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच महारेराने हे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. 18,693 पैकी काहींनी हे प्रमाणपत्र प्राप्त केले नाही आणि काहींनी त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केले नाही म्हणून त्यांची नोंदणी रद्द केल्याचे महारेराने सांगितले.
‘एमएमआर’मध्ये 21 हजार तर सिंधुदुर्गात केवळ 11 एजंट
एमएमआरमध्ये महारेराचे 21050 नोंदणीकृत एजंट आहेत. त्यापैकी मुंबई शहरात 3457, उपनगरात 8365, ठाण्यात 6760, रायगडला 1340, पालघरमध्ये 1086, रत्नागिरीत 31 तर सिंधुदुर्गला 11 एजंट आहेत. ‘एमएमआर’नंतर पुण्यात 8205, नागपुरात 1504, उत्तर महाराष्ट्रात 490, छत्रपती संभाजीनगरमध्ये 343 आणि अमरावती परिसरात 237 एजंट नोंदणीकृत आहेत.