
अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणार्या सीईटी परीक्षेविषयीच्या सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्या आहेत. 21 ऑगस्टला ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून त्यासाठी उद्या 20 जुलैपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज भरण्याची सुविधा 26 जुलैपर्यंत असून एसएससी व्यतिरिक्त इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटीसाठी 178 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर अकरावी प्रवेशात सर्व शिक्षण मंडळांच्या विद्यार्थ्यांमध्ये मेरिट राखण्यासाठी सीईटी घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार 20 जुलैला सकाळी साडेअकरा वाजल्यापासून सीईटीसाठी ऑनलाईन प्रवेशअर्ज भरता येणार आहे.
आठ माध्यमांतून प्रश्नपत्रिका मिळणार
सीईटीसाठी आठ माध्यमांतून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जात परीक्षेsचे माध्यम भरायचे आहे. विद्यार्थ्याने दिलेल्या माध्यमात त्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध होईल. इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड, उर्दू, सिंधी, तेलगू, हिंदी या आठ भाषांमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहेत. सेमी इंग्रजी माध्यम निवडलेल्या विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱया प्रश्नपत्रिकांमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयाचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून आणि सामाजिक शास्त्रे या विषयांचे प्रश्न विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जात नमूद केलेल्या अन्य माध्यमातून उपलब्ध होतील. शिक्षण मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जो 25 टक्के अभ्यासक्रम वगळला आहे त्यातील कोणताही भाग या परीक्षेत घेतला जाणार नाही.
दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी सीईटी मोफत
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीतील नियमित विद्यार्थ्यांना सीईटीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र वर्ष 2021 पूर्वी जे विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाले होते, अथवा प्रविष्ट झाले होते अशा विद्यार्थ्यांसोबतच सीबीएसई, आयसीएसई आणि इतर सर्व आंतरराष्ट्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी 178 रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने (एमसीक्यू) शंभर प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार.
- निकालानंतर गुणपडताळणी, फेरतपासणी नाही. ऑनलाईन गुणपत्रिका मिळणार
- सीईटीच्या परीक्षेनंतर मंडळाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना काही आक्षेप असल्यास नोंदवता येईल.
- विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जात नोंदविलेल्या जिल्हा, तालुका केंद्राचा विचार करून परीक्षा केंद्र निश्चित केले जाणार.
- ए, बी, सी, डी असे चार प्रश्नपत्रिका संच असतील
- अचूक उत्तराच्या पर्यायावर निळय़ा किंवा काळय़ा शाईच्या बॉलपेनने गोल करावा.
- राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा; 100 गुणांचा पेपर
- सीईटीसाठी राज्य शिक्षण मंडळाने http://cet.mh-ssc.ac.in ही वेबसाइट सुरू केली आहे.
- दहावीच्या इंग्रजी, गणित व सामाजिक शास्त्रs (इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्र) या चार विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी असेल.
- एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये चार विषयांसाठी प्रत्येकी 25 गुण दिले जातील.



























































