महावितरणला अक्षय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीसाठी केंद्राचे दोन पुरस्कार

महावितरणच्या अक्षय ऊर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरीबाबत केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि असोसिएशन ऑफ रिन्यूएबल एनर्जी एजन्सी ऑफ स्टेट्स (एआरईएएस) च्या दोन पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 2021-22 मध्ये सर्वाधिक रूफटॉप सौर ऊर्जा क्षमता जोडण्यासाठी हे पुरस्कार देण्यात आले आहेत.

एआरईएएसच्या वर्धापन दिनानिमित्त कोचीन येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या शुभहस्ते महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे आणि संचालक (वाणिज्य) डॉ. मुरहरी केळे यांनी हे पुरस्कार स्वीकारले. याशिवाय महाराष्ट्राची नोडल एजन्सी असलेल्या महाऊर्जाला सर्वोच्च बायोमास पॉवर स्थापित क्षमता आणि प्लाण्ट्सची स्थापित संख्या प्राप्त करण्यासाठी दोन पुरस्कारांनी यावेळी गौरविण्यात आले. महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक सूरज वाघमारे यांनी स्वीकारला.