
माजलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी झालेल्या निवडीत सभापती म्हणून राष्ट्रवादीचे जयदत्त नरवडे तर उपसभापती म्हणून श्रीहरी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात मागील 20 वर्षांपासून बाजार समिती आहे, त्यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 18 पैकी 12 जागा जिंकून बहुमत मिळवले होते. रविवारी बाजार समिती सभागृहात सहायक निबंधक विकास जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीसाठी सर्व सदस्यांची बैठक झाली. त्यावेळी राष्ट्रवादीकडून जयदत्त नरवडे व श्रीहरी मोरे यांनी तर भाजपकडून नितीन नाईकनवरे व मनोज जगताप यांनी सभापती व उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले होते. त्यातील नितीन नाईकनवरे व मनोज जगताप यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने सभापती म्हणून जयदत्त नरवडे व उपसभापती म्हणून श्रीहरी मोरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर आमदार प्रकाश सोळंके,माजी सभापती संभाजी शेजुळ,कल्याण आबुज यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.



























































