शेतकऱ्यांसाठी कारखाना ठरला देवदूत, साडेअकरा लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्टय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे राज्यातील साखर कारखाने अडचणीत असताना आणि ऊसाला हमीभाव न मिळत असताना माजलगाव विधानसभा मतदारसंघातील स्व.सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याची घोडदौड सुरू आहे. फक्त 31 दिवसाच्या गाळपात 1 लाख 61 हजार मेट्रीक टन गाळप पूर्ण करणाऱ्या या कारखान्याने 11 लाख 50 हजार मेट्रीक टनाचे उद्दिष्टय डोळयासमोर ठेवले आहे. ऊसाचा पहिला हप्ता प्रतिटन 2100 रूपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणारा पहिला कारखाना ठरला आहे.

माजलगाव मतदारसंघातील स्व.सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना यंदा तिसावे गाळप करत आहे. कारखान्याच्या शाश्वत विश्वासामुळे मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला आहे. संपूर्ण मतदारसंघात तब्बल 25 लाख मेट्रीक टन ऊस लागवड झाली आहे. भरपूर पाणी, मेहनत करणारा शेतकरी आणि स्व.सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्यासारखा शेतकNयांचे हित जोपासणारा कारखाना याची सांगड घालत मतदारसंघाची वाटचाल सुरू आहे. यंदा तब्बल साडेअकरा लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. दोन दिवसांपूर्वीच साखर कारखान्याचे चेअरमन धैर्यशिल सोळंके यांनी ऊसापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिटन 2100 रूपये जमा करण्याची घोषणा केली आहे. मराठवाड्यासह राज्यात 2100 रूपये पहिला हप्ता देणारा हा कारखाना अव्वल ठरत आहे. सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याने 31 दिवसांमध्ये एक लाख 61 हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले आहे. आज एका दिवसामध्ये 5600 मेट्रीक टन गाळप झाले आहे. एकुण 1 लाख 29 हजार 150 क्विंटल साखरेचे उत्पादन झालेले आहे. सरासरी साखर उतारा 8.85 एवढा आहे. मतदारसंघातील संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही असे प्रयत्न कारखान्याचे सुरू आहेत. माजलगाव सहकारी साखर कारखान्याच्या या घौडदोडीमुळे शेतकरी समाधानी झाला आहे. रास्त भाव, वेळेवर पेमेंट यामुळे शेतकNयांचा विश्वास द्विगुणीत झाला आहे. स्व.सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याने नेहमी शेतकNयांचे हित डोळ्यासमोर ठेवले आहे. ऊसाला जास्तीत जास्त भाव देण्यासाठी गाळपासह उपपदार्थ निर्मितीवरही भर दिला आहे. या साखर कारखान्याने डिस्टीलरी उत्पादनातही मोठी झेप घेतली आहे. आजपर्यंत 16 लाख 25 हजार 666 लिटर स्पिरिट तयार केले आहे. 14 लाख 71 हजार 250 लिटर इथेनॉल उत्पादन केले आहे. तर 75 लाख 55 हजार 200 युनिट वीज निर्मिती केली आहे. यातून मिळणारा प्रत्येक रूपये शेतकNयांच्या पदरात टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न सोळंके कुटुंबाचा आहे.

शिस्त आणि नियोजन

स्व.सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांनाही शिस्त लावली आहे. प्रत्येक महिन्यात गाळप होणारा ऊस नियमाप्रमाणे लागवड करण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी साखर उतारा वाढणार आहे. ऊसाचे वय वाढले तर साखर उतारा कमी होतो. म्हणून प्रत्येक दिवसाची नोंद आणि गाळप यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळेच कारखान्याचा नावलौकीक वाढत आहे. याचे सर्व श्रेय आ.प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाला आणि चेअरमन धैर्यशिल सोळंके यांच्या कार्यक्षमतेला द्यावे लागेल.