
सामना प्रतिनिधी । मुंबई
वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्ता दुभाजकावर आदळून त्यात टेम्पोतील एक प्रवासी ठार तर अन्य प्रवासी आणि दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना जोगेश्वरी येथील उड्डाणपुलावर घडली.
शनिवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलच्या समोरील उड्डाणपुलावर एक वेगात आलेला टेम्पो रस्ता दुभाजकावर आदळला. त्यामुळे टेम्पोत बसलेला प्रवासी बदरुद्दीन अन्सारी याचा जागीच मृत्यू झाला तर अन्य प्रवासी तसेच एक दुचाकीस्वार जखमी झाला. जखमी दुचाकीस्वार राजू विश्वकर्मा (27) याने दिलेल्या तक्रारीवरून जोगेश्वरी पोलिसांनी फरार टेम्पोचालकाविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
























































