जीमेलवरून करा ऑडिओ – व्हिडिओ कॉल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जीमेल आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फिचर्स आणते जेणेकरून युजर्सची कामे सोपी होतील. जीमेलवरून आता ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलदेखील करता येणार आहे. त्यासाठी युजर्सकडे जीमेलचे लेटेस्ट व्हर्जन असणे गरजेचे आहे. हे फीचर इन्स्टंट मॅसेजिंगसारखे आहे. कॉलसाठी युजर्सला चॅट टॅब मिळणार आहे. या टॅबवर क्लिक करून कॉल ऑप्शनचा वापर करता येईल. सध्या हे फीचर मोबाईल डिव्हाईससाठी असून वेबसाठी अद्याप उपलब्ध झालेले नाही.