दोन तासांत केले गजाआड 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाड पोलिसांनी अवघ्या दोन तासांत मोबाईल चोरणाऱया ठगाला  गजाआड केले. मोहम्मद अशपाक हुसेन शेख असे त्याचे नाव  आहे. मालाड येथे राहणारे एक गृहस्थ दोन दिवसांपूर्वी कामावर जात होते. मालाड स्थानक परिसराजवळ ते आले असतानाच ओळखत असल्याचा बहाणा करत दोघांनी त्यांना पाठीमागून उचलून घेतले. त्यानंतर मोहम्मदने त्याच्या खिशातील मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक धनंजय लिगाडे याच्या पथकातील शिवाजी शिंदे, बोधे, फर्नांडिस, चुंगीवडीयार, वाघ, पाईकराव, महाडिक याने तपास सुरू केला आणि चिंचोली बंदर येथून मोहम्मदला ताब्यात घेतले.