#MalangTrailer ‘मेरे लिए जान लेना मेरा नशा है…’, दिशाचा ‘हॉट’, आदित्यचा ‘रावडी’ लूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिशा पाटणी व आदित्य रॉय कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित ‘मलंग’ या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित झाला. दिशा-आदित्य या जोडीने ट्रेलरमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दोघे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकमेकांसोबत काम करत असून दोघांची जोडी सुपरहिट होईल अशी शक्यता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर जानकारांनी दिली आहे.

चित्रपटामध्ये दिशा, आदित्यसह अनिल कपूर आणि कुणाल खेमूही प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर उड्या मारल्या असून अवघ्या काही तासांमध्ये ट्रेलरला लाखोंचे हिट्स मिळाले आहेत. ट्रेलरमध्ये दिशा, आदित्य, अनिल कपूर आणि कुणाल खेमूमध्ये एक साम्य दिसत असून चौघांनाही जीव घेणे पसंद आहे. चित्रपटातील आदित्य कपूरचा ‘मेरे लिए जान लेना मेरा नशा है…’ हा डायलॉगही भाव खाऊन जात आहे.

सात फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहीत सुरी यांनी केले आहे. असिम अरोरा यांनी कथा लिहिली असून भुषण कुमार, कृष्ण कुमार, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे.

याआधी चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित झाले होते. एका पोस्टरमध्ये आदित्य कपूर व दिशा पाटणी एकमेकांना किस करताना दिसत आहेत, तर दुसऱ्या पोस्टरमध्ये आदित्यचा जबरदस्त लूक पाहायला मिळाला होता. या पोस्टरमधील आदित्यचे सिक्स पॅक बघून चाहते खूश झाले.