
मुंबईत कोरोना पूर्ण आटोक्यात आल्याने दिलासा मिळत असतानाच पावसाळी आजार बळावल्याने पुन्हा टेन्शन वाढले आहे. गेल्या आठवडाभरात मुंबईत मलेरियाचे 154, डेंग्यूचे 17, लेप्टो 23, स्वाइन फ्लूचे 51 आणि गॅस्ट्रोचे तब्बल 184 रग्ण वाढले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही पालिकेकडून करण्यात आले आहे.
मुंबईत जुलैपासून जोरदार बरसणाऱया पावसामुळे पाणी साचून राहत असल्यामुळे कीटकांचा वाढलेला प्रादुर्भाव आणि दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. यामध्ये दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, कावीळ असे आजार होतात. तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. आठडाभरापूर्वी मुंबईत मलेरिया रुग्णांची संख्या 243, गॅस्ट्रो 340, डेंग्यू 33, लेप्टो 11 आणि स्वाइन फ्लू 11 इतकी होती. मात्र यात आता आठवडाभरात मोठी वाढ झाली आहे.
पाणी साचू देऊ नका, स्वच्छता राखा
वाढणारे पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यात येत असून दीड हजार बेड तैनात ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. पावसाळी आजार रोखण्यासाठी घरोघरी तपासणी आणि औषध–गोळय़ांचे वाटपही करण्यात येत आहे. मात्र खबरदारी म्हणून नागरिकांनी घर–परिसर स्कच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिकाय औषधे घेऊ नये असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
रुग्णांची आकडेवारी
- मलेरिया 397
- लेप्टो 34
- डेंग्यू 50
- गॅस्ट्रो 524
- हिपेटायटीस 55
- चिकनगुनिया 1
- ‘एच 1 एन 1’ 62
































































