मालवण – मामा वरेरकर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला सुरुवात

317

मालवणला मोठी नाट्य परंपरा व चळवळ आहे. मात्र अलीकडच्या काळात मागे पडलेल्या या चळवळीला उर्जितावस्था आणण्याचे काम स्वराध्या फाऊंडेशन करत आहे. स्वराध्याची ही नाट्य चळवळ पुढे व्यापक होईल, असे प्रतिपादन शिवसेना तालुकाप्रमुख जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी केले.

स्वराध्या फाऊंडेशन, मालवणच्या वतीने मामा वरेरकर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे 5 वे वर्ष आहे. स्पर्धेचे उद्घाटन हरी खोबरेकर व ज्येष्ठ अभिनेते तथा स्पर्धेचे परीक्षक संजय मोने यांच्या हस्ते करण्यात आले.

हरी खोबेरकर म्हणाले, एखादी चळवळ जेव्हा सुरू होते, तेव्हा त्या चळवळीच्या पाठीशी ठराविक लोक असतात. कालांतराने त्या चळवळीचे स्वरूप विस्तारत जाते. अनेक माणसे चळवळीशी जोडली जातात. स्वराध्याची नाट्यचळवळही नजीकच्या काळात विस्तारणार आहे. मालवणला नाट्यचळवळीची पार्श्वभूमी आहे. मालवणसारख्या शहरात स्वराध्याने राबविलेल्या एकांकिका स्पर्धेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे अभिनेते क्षितीज झावरे म्हणाले. प्रास्ताविक सुशांत पवार यांनी केले. सुत्रसंचालन गौरव ओरसकर यांनी, तर आभार गौरीश काजरेकर यांनी मानले.

आपली प्रतिक्रिया द्या