पुरुषांच्या सरोगसीवर येणार चित्रपट, हा अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

1056

बॉलिवूडमध्ये सध्या हटके विषय घेऊन चित्रपट तयार केले जात आहेत. बाला, विकी डोनर, स्त्री, ड्रीमगर्ल असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट गेल्या काही वर्षात चांगलेच गाजले. हाच धागा पकडून आता पुरुषांच्या सरोगसीवर चित्रपट तयार करण्यात येणार असल्याचे समजते. या चित्रपटात मुख्य भूमिकेत राजकुमार राव दिसणार असल्याची चर्चा आहे.

राजकुमार राव हा सध्या बॉलिवूडमधला एक तगडा अभिनेता म्हणून ओळखला जातो. न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री, जजमेंटल है क्या, अलिगढ, सिटीलाईट असे कमी बजेटचे सुपरहिट सिनेमे त्याच्या नावावर आहेत. लवकरच राजकुमार पुरुषांच्या सरोगसीवर आधारित एका कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ड्रिमगर्ल चित्रपटाचे दिग्दर्शक राज शांडिल्या हे करणार असून त्यांनी या चित्रपटाची स्क्रिप्ट राजकुमारला पाठवली आहे. राजकुमारला ही स्क्रिप्ट आवडली असून त्याने चित्रपटासाची होकार कळविल्याचे समजते.

rajkumar-rao-33

राजकुमार राव लवकरच छलांग या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत नुसरत भरूचा ही अभिनेत्री दिसणार आहे. हा चित्रपट 31 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या