३८ लाख रुपये खर्चाच्या वहाळी बांधकामाचा नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते शुभारंभ

25

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण शहरातील प्रभाग तीन भरड रेवतळे येथील वालकर घरानजीक नगरपालिकेच्या वतीने जिल्हा नियोजन निधीतून बांधण्यात येणाऱ्या वहाळीच्या कामाचा शुभारंभ नुकताच नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.

दरम्यान, या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने येथील घरांना धोका निर्माण झाला होता. याठिकाणी पावसात साचणाऱ्या पाण्याचा योग्यरीत्या निचरा व्हावा अशी मागणी येथील नागरिकांची होती. त्यानुसार हे काम आपल्या प्रयत्नातून होत असल्याचे या प्रभागाच्या नगरसेविका सौ. सुनीता जाधव यांनी सांगितले.

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वहाळीच्या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, आरोग्य सभापती पंकज सादये, जि. प. सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, नगरसेविका सुनीता जाधव, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, दिपक पाटकर, अरविंद जाधव, संमेश परब, महेंद्र म्हाडगुत, किसन मांजरेकर, अंजना सामंत, नंदा सारंग, पिंट्या नाईक, पंकज पेडणेकर, मोहन वालकर, संदिप मालंडकर, युवराज कांबळी, सीमा पेंडुरकर, शुभांगी सुकी, शरद धुरी, गणेश चिंदरकर, रमण आंबेरकर, वरावडेकर आदी व इतर नागरिक उपस्थित होते.

नगरपालिकेच्यावतीने जिल्हा नियोजन निधीतून ३८ लाख ७० हजार रुपयांच्या निधीतुन वहाळीचे काम होणार आहे. अनेक वर्षांची वहाळीची मागणी पुर्ण होत असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त
करत नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या