मालवणात गणेशचतुर्थीपर्यंत सर्व शाळा बंदच राहणार!

467

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तूर्तास गणेशोत्सव कालावधीत शाळा सुरू केल्या जाणार नाहीत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतरच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी मालवण पंचायत समिती बैठकीत स्पष्ट केली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा बंद आहेत. अनेक शाळेत मुंबईसह परजिह्यातून आलेले क्वॉरंटाईन आहेत. पुढील महिन्यात होणाऱया गणेशोत्सव पार्श्वभूमीवर काही दिवस आधीच चाकरमानी गावात येण्याची शक्यता आहे. अशा स्थिती असताना शाळा सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे अहवाल शिक्षण विभागाने मागवले. या पार्श्वभूमीवर गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी आक्रमक होत सध्यस्थितीत शाळा सुरू करणे धोक्याचे ठरेल अशी भूमिका मांडली. यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सध्य स्थितीत प्राथमिक, माध्यमिक कोणत्याही शाळा सुरू केल्या जाणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या