राज्यकर्तेच मारेकरी बनलेत, ममता बॅनर्जींचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘राज्यकर्तेच मारेकरी बनले आहेत. भाजपवाल्यांनो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी दिली. ‘भाजपपुरस्कृत समाजकंटकांच्या निर्दयी हल्ल्यानंतरही आमच्या नेत्याने पाठ दाखवली नाही. त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतलीच. द्वेषाचे राजकारण आणि दया, प्रेम व करुणेच्या राजकारणातला हा फरक आहे,’ असे त्या म्हणाल्या. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. ‘हा एका व्यक्तीवरचा हल्ला नसून त्यांना निवडून देणाऱ्या जनतेवरचा व लोकशाहीवरचा हल्ला आहे, असे राहुल गांधी म्हणाले.