
सामना ऑनलाईन । कोलकाता
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर पश्चिम बंगालमध्ये उतरवण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी परवानगी नाकारली आहे. 14 एप्रिल रोजी सिलिगुडी येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा आहे. परंतु विमान उतरवण्यास परवानगी न मिळाल्याने काय करावे, असा प्रश्न काँग्रेससमोर पडला आहे.
ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षातील राजकीय नेत्याचे हेलिकॉप्टर बंगालमध्ये उतरू न देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टरही पश्चिम बंगालमध्ये उतरवण्यास परवानगी नाकारली होती. पश्चिम बंगाल सरकारच्या अधिकृत मोबाईल ऍपवरून राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरसाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतु ती नाकारली गेली.


























































