मायावती, ममतांनाही संघाचे निमंत्रण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘भविष्यातील हिंदुस्थान : संघाचा दृष्टिकोन’ या विषयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत आयोजित केलेल्या दिल्लीतील कार्यक्रमाला केवळ काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीच नव्हे तर ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, मायावती, अखिलेश यादव, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासहित प्रादेशिक पक्षांच्या अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. संघाचा हा तीन दिवसांचा कार्यक्रम राजधानीतील विज्ञान भवनात पार पडणार आहे.