आरएसएसची कार्यालये बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) सहा कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱयाला पोलिसांनी अटक केली आहे. सायबर पोलीस आणि एटीएसने कारवाई करत तामीळनाडूतून राज मोहम्मद याला अटक केली. त्याने सुलतापूरमधील कॉलेजच्या प्राध्यापकाला तीन भाषांमध्ये मेसेज पाठवून अलीगंज, उन्नावसह कर्नाटकमधील आरएसएसची 4 कार्यालये उडवून देण्याची धमकी दिली होती. लखनौ येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली.