एका माशाने बनवलं लखपती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुणाचे नशीब कसे पालटेल सांगता येत नाही. पश्चिम बंगालमधील एका मच्छीमाराचे असेच झाले आहे. महाकाय तेलिया भोला माशा सापडल्याने मच्छीमार रातोरात लखपती झाला आहे.

पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर येथे रविवारी कबीर नावाच्या मच्छीमाराने तेलिया भोला मासा पकडला. लिलावात 55 किलो वजनाचा हा मासा 13 लाख रुपयांना विकला गेला. एका परदेशी कंपनीने मासा विकत घेतला. औषधे बनवण्यासाठी माशाचा वापर होतो. म्हणूनच तो इतका महाग आहे. पकडलेला मासा मादी असून गर्भवती होती. तिच्या अंडय़ाचे वजन पाच किलो होते. दिघ्यात हा मासा बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली. त्याची तीन तास बोली चालली.