महत्त्वाची कागदपत्रं हरवली म्हणून परिवाराची केली हत्या

748
murder

बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील एका व्यक्तीने त्याची आई, पत्नी व तीन मुलींची हत्या केली आहे. परिवाराची हत्या केल्यानंतर त्याने स्वत: सुध्दा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भरतकुमार केसरी असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर खडगपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेली खडगपुरच्या कन्हैयाटोला या परिसरात भरतकुमार केसरी यांच्या मालकीचे एक दुकान आहे. मात्र त्या दुकानाचाी कागदपत्रं हरवली होती. त्यामुळे ते गेल्या दोन दिवसांपासून नैराश्यात होते. त्याच नैराश्यातून त्यांनी शुक्रवारी रात्री आई सावित्री देवी(90), पत्नी आशा देवी(40), तसेच मुलगी शिवानी केसरी(16), सिमरन केसरी(14), सोनम केसरी(11) यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यांनी घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात ते फक्त जखमी झाले. हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी भरतकुमारला खडगपूर रुग्णालयात दाखल केले आहे. तेथील उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात येणार आहेत. पोलीस सध्या भरतकुमारची चौकशी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या