
छत्तीसगढमधील कोरबा जिल्ह्यात एका 17 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या तरुणाला त्या मुलीच्या आईने व मुलीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला व तिच्या मुलीला अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर 28 वर्षीय तरुण त्याची पत्नी व दोन मुलांसोबत कोरबा जिल्ह्यातील सरयू गावात राहायचा. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती व सोबत तिने एका मुलाला देखील नेले होते. त्यामुळे सदर तरुण व्यथित झाला होता. पीडित मुलगी ही त्याची नातेवाईक होती व तिने आपल्या पत्नीला पळून जायला मदत केली असा त्याचा आरोप होता. त्यामुळे तो दररोज तिच्या घरी यायचा व तिच्याकडे लैंगिक सुखाची मागणी करायचा.
त्याच्या नेहमीच्या या त्रासाला ती मुलगी व तिची आई कंटाळली होती. सोमवारी रात्री जेव्हा तो तरुण तिच्या घरी आला त्याने थेट तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर त्या मायलेकींनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्या मारहाणीत त्याच्या ड़ोक्याला दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांना त्याचा मृतदेह आढळल्यानंतर स्निपर डॉगच्या सहाय्याने त्याने तपास सुरू केला. स्निपर डॉग पोलिसांना थेट त्या मुलीच्या घरी घेऊन गेला. तिथे पोलिसांनी त्या दोघींची चौकशी केली असता आपणच त्याला मारहाण केल्याचे सांगितले. मुलीच्या वकिलांनी त्या दोघींनी आत्मरक्षणासाठी त्याला मारहाण केली असून त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे देखील त्यांना माहित नव्हते. असे सांगितले आहे.





























































