क्षुल्लक वादातून प्रेयसीची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्षुल्लक वादातून प्रियकराने प्रेयसीवर कोयत्याने वार करून तिची हत्या केल्याचा प्रकार किसननगर भागात समोर आला आहे. शिवटेकडी भागात राहणाऱया गणेश ठाकूर (35) याचे सुनीता कांबळे (34) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपासून त्यांच्यात क्षुल्लक कारणांवरून वाद सुरू होते. त्यातच गणेश तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून गणेशने घरात सुनीतावर कोयत्याने वार केले. यामध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक आयुक्त गजानन काब्दुले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने गणेशला ताब्यात घेतले.