डोकं पिंजऱ्यात अन् चावी पत्नीकडे! सिगारेटची सवय सोडविण्यासाठी इब्राहिम यांचा अनोखा जुगाड

काही केल्या आपली धूम्रपानाची सवय सुटत असल्याने तुर्कस्तानमध्ये राहणाऱया इब्राहिम नावाच्या एका व्यक्तीने अनोखा जुगाड केला आहे. इब्राहिम यांनी चक्क पिंजऱयाप्रमाणे दिसणारे हेल्मेट तयार केले आहे. त्यात त्यांचं डोकं दिवसभर लॉक असते. या हेल्मेटची चावी त्यांच्या पत्नी, मुलांकडे असून केवळ खाण्यापिण्यासाठीच ते हेल्मेट काढतात.

वयाच्या सोळाव्या वर्षापासून इब्राहिम स्मोकिंग करत आहेत. दररोज एक ते दोन पॅकेट सिगारेट ओढत होते. पण एका घटनेमुळे त्यांचे आयुष्य बदलले. ही घटना म्हणजे त्यांच्या वडिलांचा फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे झालेला मृत्यू. तेव्हाच इब्राहिमने आपल्यासह कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला.

कधी तलफ आली तरी सिगारेटच्या आहारी जाऊ नये याकरिता त्यांनी खास हेल्मेट बनवून घेतले आहे. 130 फूट तांब्याच्या वायरपासून हे हेल्मेट बनवण्यात आले आहे. सामान्यपणे हेल्मेट घातलं की तसं ते काढताही येते. पण इब्राहिमने हे हेल्मेट घातलं की त्याला काढता येत नाही, म्हणजे त्यासाठी दुसऱया कुणाची तरी मदत घ्यावी लागते.

आपली प्रतिक्रिया द्या