गरोदर बायको दररोज आईला भेटते म्हणून तरुणाने केली सासूची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder-knife

गरोदर बायको दररोज तिच्या आईला भेटायला जाते म्हणून एका तरुणाने त्याच्या सासूची गळा चिरून हत्या केली आहे. प्रफुल सियाली असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे.

प्रफुल्लचे रेखा शर्मा यांच्या लहान मुलीशी गेल्या वर्षी विवाह झाला होता. प्रफुल्लची पत्नी गरोदर होती. तिची आई रेखा जवळपासच राहायची. त्यामुळे प्रफुल्लची पत्नी दररोज तिला भेटायला जायची. त्यामुळे वैतागलेल्या प्रफुल्लने पत्नीला दररोज आईला भेटू नको अोसे सांगितले. मात्र पत्नीने नकार दिल्याने त्याने सासूचाच काटा काढायचा ठरवला. तो सीसीटीव्ही फुटेज व मास्क घालून सासूच्या घरी गेला व तिथे त्याने सासूची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर तो पुन्हा घरी आला व काहीच झाले नाही असे वागू लागला. रेखा शर्मा यांची हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला असता रेनकोटमधला माणूस हा दुसरा तिसरा कुणी नसून रेखा शर्मा यांचा जावई प्रफुल्ल असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी प्रफुलला अटक केली आहे,