मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या

64

विजय जोशी । नांदेड

मराठा आरक्षणाचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले असून नांदेड़ जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी छतावरुन उड़ी घेऊन आत्महत्या केली. गणपत बापूराव आबादार असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून ते गेल्या तीन-चार दिवसापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत होते. दरम्यान याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली असून निर्मल ते कल्याण राष्ट्रीय महामार्गावार संतप्त जमावाने रस्त्यावर टायर पेटवून चक्का जाम आंदोलन सुरु केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील सावरगांव येथील रहिवासी असलेले गणपत आबादार हे गेल्या कागी दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी प्रसंगी बलिदान देईन असे देखील त्यांनी जाहीर केले होते. त्यांच्याकडे एकच एकर जमीन असून आर्थिक परिस्थिती प्रचंड हलाखीची होती. या विवंचनेला कंटाळून शनिवारी रात्री छतावरुन उड़ी घेऊन आत्महत्या केली. गणपत यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यात त्यांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. सकाळी सहा वाजता गावकऱ्यांना गणपत यांचा मृतदेह निदर्शनास आली. गणपत आबादार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या