माझा मुलगा साधा आहे! विराटच्या मुलीला धमकी देणाऱ्य़ा आरोपीच्या वडिलांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या 9 महिन्यांच्या मुलील धमकी देणार्‍या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या सायबर सेलने रामनागेश श्रीनिवास अकुबाथिनी या इंजिनीअर असलेल्या तरुणाला हैद्राबादहून अटक केली आहे. रामनागेश या तरुणाला लाखो रुपयांचा पगार आहे. आपला मुलगा क्रिकेटप्रेमी आहे आणि तो साधा सरळ असल्याची प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी दिली आहे.

रामनागेश हा पेशाने इंजिनीअर असून एका फूड डिलिव्हरी ऍपसाठी काम करतो. रामनागेशचे वार्षिक उत्पन्न 24 लाख रुपये आहे. परदेशात जाऊन उच्चशिक्षण घेण्याची त्याची योजना होती. तसेच पुढील काळात पैसे जमा करून स्टार्ट अप करण्याचाही त्याचा विचार होता.

T20 वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानचा पाकिस्तान विरोधातील सामन्यात पराभव झाला. त्यानंतर हिंदुस्थान टीममधील खेळाडू शमी मोहम्मद हा सोशल मीडियावर ट्रोल झाला. यावर विराटने एखाद्या व्यक्तीवर धर्मावरून टीका करणे चूक आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. तेव्हा रागाच्या भरात रामनागेशने ट्विट करून विराटच्या मुलीला धमकी दिली होती.

आपला मुलगा एक क्रिकेट प्रेमी आहे. तो अशा प्रकारे व्यक्त होत नाही, त्याने असे का केले हे आपल्यालाही माहित नसल्याचे वडील श्रिनिवास यांनी म्हटले आहे.