‘बुनियाद’ फेम मंगल ढिल्लन यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते मंगल ढिल्लन यांचं कर्करोगाने निधन झालं. जवळपास 1 महिना ते लुधियाना येथील कर्करोग रुग्णालयात उपचार घेत होते. रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या रेखा यांच्या खून भरी मांग या चित्रपटातही त्यांनी भूमिका केली होती. तर छोट्या पडद्यावरील बुनियाद या मालिकेतून त्यांना प्रसिद्धी मिळाली.

हिंदीच नव्हे तर पंजाबी चित्रपटसृष्टीतही मंगल हे प्रसिद्ध होते. अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करण्याखेरीज त्यांनी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं होतं. त्यांचा जन्म फरीदकोट येथे झाला होता. त्यांनी दिल्ली येथे नाटकांमधून काम करत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1980 सालात त्यांनी अभिनयात पदविका पूर्ण केली.