देवाच्या कोपामुळे आमचा मित्र मेला; दोन आरोपींची गुन्ह्याची कबूली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगलोरमध्ये एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. जादूटोण्याच्या नावाखाली मंदिरात आक्षेपार्ह वस्तू फेकणाऱ्या तीन जणांपैकी एकाचा अचानक मृत्यू झाला. या घटनेने त्या दोघांना धक्का बसला. आपण केलेल्या चुकीची देवाने शिक्षा केली आहे. देवाच्या कोपामुळेच आपला मित्र गेला, असे त्यांना जाणवले आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

मंगलोरमधील कोरगाजा मंदिरात आक्षेपार्ह वस्तू फेकल्याप्रकरणी पोलिसांनी दोनजणांना अटक केली आहे. त्या दोघांनी आपल्या ईशनिंदा केल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली देण्यामागे विचित्र कारण आहे. गुन्ह्याची कबुली देण्यामागे आणि त्यांचे हृदयपरिवर्तन होण्यासाठी एक महत्त्वाची घटना घडली आहे. अब्दुल रहीम आणि तौफीक अशी त्यांची नावे आहेत.

या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तिघांपैकी नवाजचा अचानक मृत्यू झाला. मृत्यूपुर्वी त्याने अब्दुल आणि तौफीकला सांगितले की देवाच्या कोपामुळे आपल्यावर हे संकट आले आहे. त्यामुळे माझा मृत्यू अटळ आहे. तुम्हीही देवाचा कोप टाळण्यासाठी आपल्या गुन्ह्याची कबुली द्या. मित्रांना हे सांगितल्यानंतर त्याने प्राण सोडला. या घटनेने त्या दोघांना धक्का बसला.

आपल्या मित्राचा मृत्यू ईशनिंदेमुळचे झाला अशी त्यांची ठाम समजूत झाली. त्यामुळे मृत्यूच्या भीतीमुळे त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. आपण ईशनिंदा केली त्यामुळे आपला मित्राचा मृत्यू झाला. आता त्याने सांगितल्याप्रमाणे आपण देवाच्या कोपापासून वाचण्यासाठी गुन्ह्याची कबुली द्यावी, असे त्यांच्या मनात आले. त्यांचे हृदय परिवर्तन झाले आणि मंदिराच्या पुजाऱ्यांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पुजाऱ्यांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसासमोरही त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मंदिरातील भाविकांच्या भावना दुखावण्यासाठी जादूटोण्याचा नावाखाली आपण मंदिरात आक्षेपार्ह वस्तू फेकल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, नवाजच्या मृत्यूमुळे ईशनिंदेची आमची कूक आमच्या लक्षात आली. त्यामुळे गुन्ह्याची कबुली देत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानेच आम्हाला गुन्हा कबूल करण्यास सांगितले, असे त्यांनी सांगितले.